By Editor on Thursday, 26 October 2023
Category: महाराष्ट्र

[lokmat]...तर कदाचित CM शिंदेंकडे जादूची काठी असेल'

मराठा आरक्षणावरुन सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

"मुंबई: शिवरायांची शपथ... मराठा आरक्षण देणारच. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला आश्वस्त केले. शिंदे गटाचा दुसरा दसरा मेळावा आझाद मैदानावर मंगळवारी पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.

मी देखील सर्वसामान्य मराठा कुटुंबातील आहे, मला त्यांचे दुःख, वेदना कळतात. कोणावरही अन्याय न करता, कुणाचेही न काढून घेता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या या विधानावर राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्रिपल इंजिन सरकारला ४० दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. रात्री बारापर्यंत वाट पाहावी लागेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ट्रिपल इंजिन सरकारवर बोलायचे नाही. मुख्यमंत्री छत्रपतींची शपथ घेऊन जर आरक्षण देण्याचं बोलले असतील, तर त्यांच्याकडे कदाचित जादूची काठी असेल, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. तसेच चंद्रशेखर बावनकुळे ज्या पक्षात आहेत. त्या पक्षाचे २०० आमदार आणि ३०० खासदार असुन सुद्धा पवार आणि ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय स्वस्थता मिळत नाही, अशी टीकाही सुप्रिया सुळेंनी केली आहे. गृहमंत्र्यांना एक आई, नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून विनम्रपणे प्रश्न करते, तुम्ही ड्रग्ज माफियांची नावं सांगणार होता त्याचं काय झालं?, असा सवालही सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे, यासाठी आपला लढा सुरू आहे. परंतु, आत्महत्या होत असतील तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे युवकांनी आत्महत्या करू नयेत. आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. तसेच नेतेमंडळींना गावबंदी करा, कायदा हातात घेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या १६ ते १७ युवकांच्या कुटुंबियांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही. एकूणच आजवर एकाही आश्वासनाची पूर्तता शासनाकडून झालेली नाही. यामुळे आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले जात आहे. 

काही मदत लागल्यास सांगा- संभाजीराजे छत्रपतीमनोज जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केल्यानंतर आज संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मी प्रामाणिकपणे येथे आलोय, काही मदत लागली, तर सांगा, असं संभाजीराजे यांनी सांगितले. तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी प्रयत्नशील, असं संभाजीराजे जरागेंना म्हणाले. छत्रपतींचा वंशज म्हणून ही माझी जबाबदारी आहे. मनोज जरांगेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहीले पाहिजे. जरांगेंनी उपोषण करावे, पण किमान पाणी तरी प्यावे, अशी विनंती देखील संभाजीराजे यांनी यावेळी केली.",

'...तर कदाचित CM शिंदेंकडे जादूची काठी असेल'; मराठा आरक्षणावरुन सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | NCP MP Supriya Sule has reacted on Maratha reservation. | Latest mumbai News at Lokmat.com

Leave Comments