सुप्रिया सुळेंचा आरोप
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीसांनीही त्यावर उत्तर दिले. या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने आता पुन्हा अनिल देशमुखांवर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. "अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, याचे सर्व परावे सीबीआयकडे असल्याचे वाझेने म्हटले आहे. मी या प्रकरणात नार्को टेस्ट करण्यासही तयार असल्याचे सचिन वाझे यांनी म्हटले आहे.