आधी महाराष्ट्रात नागपूर ही क्राइम सिटी होती. मात्र आता हा बदल होत चालला असून आता पुणे शहर क्राईम सिटी झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात क्राईम रेट वाढला असून शिक्षणाचं माहेर घर असलेले पुणे शहर आज क्राइम सिटी म्हणून उदयास येत असल्याचं दुर्दैव असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितल. याला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचे सुळे म्हणाल्या. आज महाराष्ट्रात पाऊस बेरोजगारी आणि दुष्काळ असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, सरकारनं पूजा खेडकर यांच्या बाबत सविस्तर माहिती द्यावी, सरकारने यासाठी दोन-तीन आठवडे घ्यावे आणि खरी माहिती जनतेसमोर आणावी असे सुळे म्हणाल्या. आरएसएसच्या मुखपत्रातून सांगण्यात आले होते की अजित पवारांना बरोबर घेतल्याने पक्षाचे नुकसान झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, आर एस एस आणि भारतीय जनता पक्ष हे मित्र आहेत. सातत्याने आरएसएस च्या मुखपत्रातून अशा सूचना येतात यावर आम्ही काय बोलणार? त्यांच्या आघाडीचा हा अंतर्गत प्रश्न असल्याचे सुळे म्हणाल्या.