सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी NCP-SCP leader Supriya Sule यांनी आज पुण्यामध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत मूक निषेध व्यक्त केला आहे. आज धनयंजय मुंडे यांनी या प्रकरणी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख यांची ज्या क्रुरतेने हत्या झाली त्याचे फोटो वायरल झाले आहेत. ते फोटो पाहून सारा महाराष्ट्र हळहळला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज मारेकर्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.