By newseditor on Saturday, 10 February 2018
Category: महाराष्ट्र

माझा भाऊ माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल : सुप्रिया सुळे

माझ्या भावाला तुम्ही ओळखलंच नाहीत. दादा माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबद्दल बोलताना सांगितले. सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील विविध मुद्द्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

“मुंबईत राष्ट्रवादीची संघटना बांधणी कमी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना बांधण्यास कमी पडलो, अशी कबुली सुप्रिया सुळे यांनी दिली. शिवाय, "बाळासाहेबांनी शिवसेनेची चांगली संघटना बांधली, पण रचनात्मक बांधणी नाही. मात्र, संघटना बांधण्यापेक्षा चांगलं काम काय केलं, हाही प्रश्न आहे.", असे म्हणत सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवाय, त्यांनी शिवसेना, भाजपच्या मुंबईतील कारभारावरही टीका केली.

“…म्हणून भाषणात नागिण संबोधलं कुंडल्यांसदर्भातील मुंख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारल्यास, त्या म्हणाल्या, "मुख्यमंत्री कुंडल्या काढणार म्हणाले होते, त्यावेळी भाषणाच्या ओघात नागिन असं संबोधलं. मुख्यमंत्री माझी कुंडली काढणार असतील, तर मी नाही ऐकून घेणार "

 “2019 पूर्वीच राज्याची निवडणूक येऊ शकते "शिवसेना-भाजपच्या भांडणात महाराष्ट्राचं नुकसान झालं. यांचं जनतेकडे लक्ष नाही. राज्य सरकारची निवडणूक 2019 च्या आधीही येऊ शकते. या सरकारने विश्वासार्हता गमावलीय, 2 वर्षांच्या आतच 1 विकेट (खडसे) पडली.", असे म्हणत मध्यवधी निवडणुकांसंदर्भात सुप्रिया सुळेंनी मत मांडलं.

"होय, आमच्या घरात घराणेशाही" "होय, आमच्या घरात घराणेशाही आहे. मात्र, आम्ही लोकांमधून निवडून आलोय. घराणेशाहीमुळे तुम्ही एखाद्या वेळी निवडून याल, पण तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागतंच", असे सुप्रिया सुळेंनी घराणेशाहीबाबत बोलताना सांगितले. मात्र, माझ्या आणि दादाच्या मुलांनी राजकारणात येऊ नये, अशी आमची इच्छा आहे, असेही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.

काँग्रेससोबत आघाडीशी आमचा नेहमीच प्रयत्न असतो. आम्ही एका ताटात जेवलो आहे, त्यामुळे त्यांच्यावर करणार टीका नाही, असे सुप्रिया सुळे काँग्रेसबद्दल म्हणाल्या. शिवाय, राहुल गांधी अतिशय चांगला सहकारी ही माझी भूमिका आहे, असेही त्यांनी न विसरता सांगितले.

खासदार सुप्रिया सुळेंचे माझा कट्टावरील महत्त्वाचे मुद्दे :                                    
Leave Comments