राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचा असल्याचा निकाल गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे वृत्तवाहिनीशी बोलतना म्हणाल्या, 'तुम्हाला माझी प्रतिक्रिया नेमकी कशावर हवी आहे. कॉपी पेस्टवर? जे शिवसेनेचं झालं तेच स्टेप बाय स्टेप राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं. त्यामुळे मला काही आश्चर्य किंवा काही वाटत नाही. कारण नियम, कायदे काहीच खरं नाही, सगळंच मोडायचं. जे शिवसेनेचं केलं तेच आमचं करायचं, असं आहे ते, यामध्ये नवीन काहीच नाही. क्रिएटिव्हिटीपण नाही.'