By Editor on Thursday, 18 September 2025
Category: महाराष्ट्र

[Maharashtra Times]ज्यांनी पक्ष सोडला त्यांची चौकशी सुरूच; कार्यकर्त्यांना बळ, सुळेंचं भाषण!

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पार पडलं. यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांसह अनेक नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुप्रिया सुळेंनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतरही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होतो, हे खूपच दुर्दैवी आहे. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. कुणीही पक्ष सोडून गेलं तरी त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. नवे टॅलेंट नक्कीच पुढे येईल आणि ते पक्षाला आणखी मजबूत बनवतील. 

Leave Comments