By Editor on Monday, 17 April 2023
Category: महाराष्ट्र

माणसाच्या मृत्युची किंमत पाच लाख रुपये कशी?

सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला सवाल

 Supriya Sule News Update: मला गॉसिपला वेळ नाही.लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे अनेक काम आहेत.चांगला कष्ट करणारा नेता असेल तर सर्वांना हवा असतो,तसेच अजितदादाही हवे असतात . त्यामुळे अशी वक्तव्ये केली जात असल्याची अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावरुन राज्याचा राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावरुन सुप्रिया सुळे यांना विचारले असता. त्या म्हणाल्या की, ''तुमच्या चॅनेलला महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात दाखवले. तुम्ही सगळ्यांनी एक-एक युनिट लावा, राज्यात अनेक प्रश्न आहेत. राज्यात अनेक चुकीचं काम होतायेत. एक कार्यक्रम रद्द केल्याने असं काही होत नाही, असं सांगत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चा धुडकावून लावल्या आहेत.

याचवेळी त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात झालेल्या घटनेवरही भाष्य केलं आहे. 'ज्या घरातले लोक गेलेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. सगळ्यांनी कार्यक्रम करताना संवेदनशील असायला हवं. पण हे असंवेदनशील झालयं. माणसाच्या मृत्युची किंमत ५ लाख रुपये कशी होते? पण हे दुर्दैवी आहे, महाराष्ट्र सरकारने एक कमिटी केली पाहिजे. मी धर्माधिकारी साहेब यांच्याकडेही गेले होते. या सर्व प्रश्नांची महाराष्ट्र सरकारने उत्तरे दिली पाहिजेत. हे ईडीच सरकारचं असंवेदनशील आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालं असतानाही, राज्य सरकार याबद्दल पण गांभीर नाही, अशी टिकाही त्यांनी केली आहे.

Sarkarnama News :माणसाच्या मृत्युची किंमत पाच लाख रुपये कशी? सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला सवाल How is the cost of a person's death 5 lakh rupees Supriya Sule's question to the state government

Leave Comments