छगन भुजबळ यांनी मुंबईतील एका कुटुंबाचं घर लाटल्याचा गंभीर आरोप नाशिक इथल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या पीडित कुटुंबासह त्यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला. पण आता दमानियांच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी भुजबळांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असून ४८ तासांत पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.