By Editor on Tuesday, 10 October 2023
Category: महाराष्ट्र

'हा' खासदार गायब अन् सुप्रिया सुळेंचं भन्नाट भाषण, एकच हशा पिकला

राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे रविवारी दुपारीपासून सोलापूरच्या दौऱ्यावर होत्या. सोलापूर-हैदराबाद रोडवरील बंदेनवाज मंगल कार्यालयात अल्पसंख्याक मेळाव्यात खा.सुप्रिया सुळें व रोहिणी खडसे प्रमुख उपस्थिती म्हणून होत्या. मेळाव्यात खा.सुप्रिया सुळेंनी स्थानिक प्रश्नांवर भाषण केले. येथील लोकप्रतिनिधी देखील मिश्किल टिप्पणी करत भाजपवर टीका केली. सोलापूरचे खासदार कोण आहेत,बॉस,मिसिंग आहेत का? सोलापूरचे खासदार कोण आहेत? मला माहिती नाही. मात्र, तुम्हाला तरी माहिती आहे का? मैंने उनको ना देखा है... ना सूना है...., कौन है भैया…? अगर बेपत्ता है, तो पुलिस ठाणें मे जाके कंप्लेंट करो अशी मिश्किल टिप्पणी करत अल्पसंख्याक मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी संवाद साधला. 

Leave Comments