By Editor on Tuesday, 02 May 2023
Category: महाराष्ट्र

सरकारनं संवेदनशिलता दाखवली- सुप्रिया सुळे

आंदोलनकर्त्यांचा गैरसमज दूर झाल्याशिवाय बारसू रिफायनरी हा प्रकल्प पुढे रेटणार नाही. त्या संदर्भात शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. शेतकऱ्यांचे रिफायनरी संदर्भातील काही गैरसमज आहेत. ते कशा पद्धतीने दूर करता येतील,  बारसू या रिफायनरी प्रकल्पात शेतकऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करूनच हा प्रकल्प पुढे नेला जाईल. काही शंका आंदोलकांनी शरद पवार यांच्याकडे मांडल्या होत्या. त्यावर सविस्तर चर्चा झाली. शासन आंदोलकांच्या प्रमुखांशी बोलायला तयार आहे. स्थानिकांशी बोलूनच पुढील निर्णय घेतला जाईल. कुणासोबतही जबरजस्ती केली जाणार नाही, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. या भूमिकेचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले आहे. 

Leave Comments