By Editor on Thursday, 24 August 2023
Category: महाराष्ट्र

[deshdoot]राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

सुप्रिया सुळेंची मागणी

​जून महिना कोरडा गेला. त्यानंतर जुलै महिन्यात थोड्या फार प्रमाणात पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यातही वरुणराजाने पाठ फिरवल्याने बळीराजाच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे. पहिल्या पावसांनंतर पेरणी केलेली पिके पावसाअभावी करपू लागली आहे. संपूर्ण हंगाम वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात जून, जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी आहे. १ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे.

बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. ही परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे. हे पाहता या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. परिस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा. तसेच पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांसाठी चारा छावण्या आणि इतर दुष्काळी कामे हाती घेण्यासंदर्भात तातडीने सकारात्मक विचार करुन अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Supriya Sule : राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; सुप्रिया सुळेंची मागणी | Supriya Sule has demanded that farmers should be given relief by announcing drought in the state

Leave Comments