By Editor on Saturday, 28 October 2023
Category: महाराष्ट्र

[KBC NEWS]पाठीत वार करू नका...खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला

हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. त्याच महाराष्ट्राची मी एक स्वाभिमानी मुलगी आहे. परिणामी मराठी माणसांवर दिल्लीच्या बादशहाने कितीही अन्याय केला तरी हा महाराष्ट्र कधीही त्याच्यासमोर झुकला नाही आणि पुढे झुकणारही नाही. त्यामुळे ही मराठी अस्मिता वाचवण्यासाठी हा लढा लढू आणि आगामी निवडणुकीत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला हल्लाबोल चढवला. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

Leave Comments