By Editor on Friday, 01 December 2023
Category: महाराष्ट्र

[politicalmaharashtra]“शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीचं तिकीट मिळत नाही का ?”

सु्प्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी केलीय. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टिका केलीय.

महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे अतिशय अडचणीत सापडला आहे. अशावेळी शासनाने त्यांना मदतीचा हात देऊन उभा करायला हवे. परंतु सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची कसलीही काळजी नाही असे स्पष्ट दिसते. पालकमंत्रीपदाची भांडणं सोडवायला दिल्लीची वाट दिसते पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांना दिल्ली दिसत नाही अशी टिका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

दरम्यान, पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, जेव्हा या सरकारमधील नेत्यांची वैयक्तिक कामे असतात तेव्हा विनाविलंब ते दिल्लीला पळतात मग शेतकऱ्यांना जेव्हा गरज आहे. तेव्हा यांना दिल्लीचं तिकीट मिळत नाही का ? महाराष्ट्र सरकारने दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत आणली पाहिजे व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

"शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीचं तिकीट मिळत नाही का ?" सु्प्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल - Political Maharashtra

Leave Comments