By Editor on Thursday, 02 November 2023
Category: महाराष्ट्र

[politicalmaharashtra]“सर्वच समाजाला फसवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय, राजीनामा द्या”

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

मुंबई : अधिवेशनामध्ये सर्व आमदारांना बोलण्याची संधी दिली पाहिजे. सर्वसामान्य जनतेचा मायबाप म्हणून आम्ही भूमिका मांडतो. हीच भूमिका मांडता येत नसेल तर काय उपयोग त्या जबाबदारीचा, आमदार खासदारकीचा. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर रोष व्यक्त केला. तसेच मनोज जरांगे पाटलांनी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. त्याचं काय झालं? असा सवालही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. 

सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवा आणि विशेष अधिवेशन घ्या, अशी मागणी सातत्याने करीत आहे. राज्यातील मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण, आणि मुस्लिम आरक्षण यासंदर्भात सर्वात जास्तवेळा मुद्दा मांडणारी खासदार मी आहे. मनोज जरांगे पाटलांना ज्या प्रकारे दगाफटका केला आहे. त्याप्रकारे या राज्यातील सर्वांना त्यांनी दगाफटका केला आहे. देवेंद्र फडणवीस त्याच सरकारमध्ये आहेत ना . मग ४० दिवसाचा मॅजिक आकडा आणला कुठून? सातत्याने सगळ्या समाजाचा अपमान करा, त्यांना दुखवा, त्यांना फसवण्याचं काम भ्रष्ट जुमला पार्टीचं खोके सरकार करीत आहे. हेच त्यांचं अपयश आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सगळ्याच समाजाला भाजपने धोका दिला आहे. आज राज्यात कुणीही सुरक्षित नाही. त्याला सर्व राज्याचे गृहमंत्री जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. यातच त्यांनी शिंदेंना अपात्र केलं तर त्यांना आम्ही विधानसभेवर नेऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहे. त्यामुळे शिंदेंना देखील भाजपने फसवलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला आहे.

"सर्वच समाजाला फसवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय, राजीनामा द्या," सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल - Political Maharashtra

Leave Comments