सुप्रिया सुळेंचे गंभीर आरोप
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "अदृश्य शक्ती, दिल्लीमध्ये अदृश्य शक्ती आहे. त्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. हे सर्व कोणाच्या जिवावर चालले आहे. ते सर्व दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या जीवावर चालले आहे. अदृश्य शक्ती त्यांच्या मागे उभी राहिली आहे. त्यामुळे तर हे सर्व सुरू आहे. अदृश्य शक्ती नसतील तर हा सर्व खेळ जमला असता का? हे सर्व दुसऱ्यांच्या जीवावर चालले सगळे. ही अदृश्य शक्ती महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण आणि खचीकरण म्हणजे फक्त राष्ट्रीय पक्ष नाही. रोजगारामध्ये महाराष्ट्राचे देशात महत्व कसे कमी होईल, हे मोठे कट कारस्थान हे अदृश्य शक्ती दिल्लीवरून महाराष्ट्राच्या विरोधात काम करते. हे मी डेटानुसार सांगू शकते. मी त्यांच्यासारखे कधीही खोटे आरोप करत नाही. मी वास्तवतेत जगते. मी डेटानुसार सांगू शकते की, अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात कशी आहे", असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे.