By Editor on Friday, 08 September 2023
Category: महाराष्ट्र

[Saam TV ]आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा

सुप्रिया सुळे यांची मागणी

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघाला नाही. मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्यावरून मागे हटायला तयार नाहीत. दरम्यान, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य आणि केंद्र शासन गंभीर नसल्याची टीका करत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली.

Leave Comments