राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात शिवस्वराज्य यात्रेला हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची एक ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकवली आहे. मेहबूब शेख यांनी सुळेंकडे मोबाईल दिल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग ऐकवली. त्यामुळं आता यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.