By newseditor on Friday, 12 October 2018
Category: महाराष्ट्र

भाजपची सत्तेची मस्ती जनताच उतरवेल : सुप्रिया सुळे




सरकारनामा ब्युरो, गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018
जळगाव : राज्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार तसेच पदाधिकारी चुकिचे विधान करीत आहेत. आमदार चक्क मुलीना पळवून नेण्याच्या गोष्टी करतात, परंतु गृहविभाग त्यांच्यावर काहीही कारवाई करीत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. भाजपला खरोखरच सत्तेची मस्ती आली आहे, जनताच आता ती मस्ती उतरवेल असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकांराशी बोलतांना व्यक्त केले. 


सुळे काल (ता. 10) पासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या, की राज्यात महिलामध्ये असुरक्षततेची भावना आहे. महिलांच्या मनात भिती आहे. त्यांच संरक्षण हे सरकार करू शकत नाही, त्यात सत्तेतील आमदारच मुलीना पळविण्याची विधान करतात. त्यांच्यावरही कारवाई होत नाहीत. राज्यातील सरकार संपूर्णपणे असंवेदनशील झालेले आहे. त्यांना सत्तेची मस्ती आली आहे. आता जनताच त्यांची मस्ती उतरविणार आहे.

दुष्काळ जाहीर करावा
मराठवाडा, खानदेश भागात पाण्याची परिस्थित भीषण आहे. परंतु हे शासन झोपलेले आहे. अद्यापही दुष्काळ जाहीर करून उपययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्‍टोबरनंतर दुष्काळ जाहीर करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. जर दुष्काळाची स्थिती आहेच तर मग तो जाहीर करण्यासाठी शासन विलंब का करीत आहे. दुष्काळ निवारण्यासाठीही शासन वेळकाढू धोरण राबवित आहे. असा आरोपही त्यांनी केला.

http://www.sarkarnama.in/supriya-sule-attack-bjp-government-29587