संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मस्साजोग येथे ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. दरम्यान धनंजय देशमुख यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी फोन करून विचारपूस केली. लढाई मोठी आहे, तब्येतीची काळजी घ्या असं यावेळी सुप्रिया सुळेंनी सांगितलं. सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिच्या परीक्षेबाबतही चौकशी केली. सरकारने संवेदनशीलता दाखवून मार्ग काढावा अशी अपेक्षा सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.