50 खोके इज नॉट ओके
सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुण्याच्या खासदारांना जर मंत्रीपद मिळत असेल तर चांगला आहे. मात्र ज्या प्रकारे घटना पुण्यात घडत आहेत त्यावर काहीतरी ॲक्शन घेणे गरजेचे आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख होती. त्याला काळीमा फासण्याचा काम सत्ताधाऱ्यांनी केला आहे. ड्रग्स असेल ड्रिंक अँड ड्राईव्ह असेल अशा अनेक घटना घडत आहेत. पाऊस पडला आहे पाणी तुम्हाला आहे त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे. अडीच वर्षे झाले महापालिका निवडणुका नाहीत. हे खोके सरकार फक्त फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे. प्रशासकीय कामांमध्ये होतो कुठेही लक्ष सत्ताधाऱ्यांचा दिसत नाही, असंही सुळे यांनी सांगितलं.