By Editor on Thursday, 24 August 2023
Category: महाराष्ट्र

[saamtv]राज्यात दुष्काळ जाहीर करा

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

 राज्यातील पावसाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनली आहे. जून महिना कोरडा गेला. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण दिलासादायक राहिलं. मात्र ऑगस्ट महिनाही आतापर्यंत कोरडा गेला आहे. पावसाने ओढ दिल्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

पहिल्या पावसांनंतर पेरणी केलेली पिकं पावसाअभावी करपू लागली आहे. संपूर्ण हंगाम वाया गेल्या शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. याच परिस्थितीवर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

​सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटलं की, महाराष्ट्रात जून, जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी आहे. १ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. ही परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे. हे पाहता या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Supriya Sule News : राज्यात दुष्काळ जाहीर करा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची मागणी| ncp mp Supriya Sule s demand to declare drought in state | Saam TV

Leave Comments