संस्कार काय असतात आणि मराठी संस्कृती काय असते ते यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं. चव्हाणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन चालत राहिलो तर राज्यात सध्या सुरू असलेल्या गोष्टी खरंच अस्वस्थ करणाऱ्या आहेत. यामुळे मायबाप जनतेचे नुकसान होत आहे. २०० आमदारांचं एक सरकार आहे, पण ते स्थीर नाही. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचं नुकसान होत आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) सरकारवर निशाणा साधला आहे.