मागील दोन दिवसांपासून पुण्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. पुण्याला पाणीपुरवठा देणारे खडकवासला धरण पूर्ण भरल्यामुळे आणि पाऊसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र पहाटे 4 वाजता विसर्ग करण्यात आल्यामुळे अनेक नदीलगत असणाऱ्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. लोकांची गैरसोय झाल्याने रोष व्यक्त करण्यात आला. या प्रकरणावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.