By Editor on Thursday, 26 January 2023
Category: पुणे शहर

[Maharashtra Today]उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार

सुप्रिया सुळे यांचे विधान

पुणे :- उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत मोठे विधान केले होते. शरद पवार हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान आंबेडकर यांनी केलं होते. त्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले होते. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया देऊन आंबेडकर यांच्यावादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही भाष्य केले आहे. यावेळी बोलतांना खासदार सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहे. याशिवाय त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याबद्दल मोठं भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे हेच खरे बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे वारसदार असल्याचे म्हंटले आहे. शिवसेना फूटीवर सुप्रिया सुळे यांनी हे भाष्य केले आहे. 

सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल करत असतांना म्हंटलंय, केंद्र सरकार आणि राज्यातील एकनाथ शिंदेच सरकार सुडाचं राजकारण करतंय. आम्ही एवढी वर्ष सत्तेत होतो पण सुडाचं राजकारण कधी केलं नाही, सत्तेत आल्यावर कधी करणार नाही, विरोधात असेल तर पक्षात प्रवेश केला की माफ असं सुरू आहे.

वंचित आणि ठाकरे युतीवर जयंत पाटील बोलले आहे, जयंतरावांच स्टेटमेंट पुन्हा ऐका आणि मला प्रश्न विचारा असं म्हणून सुप्रिया सुळे यांनी त्यावर बोलणं टाळलं आहे. सुरू असलेलं सुडाचं राजकारण वाईट आहे, उद्वव ठाकरेंच्या वडिलांचे पक्ष उभा करण्यात कष्ट आहेत, उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंच नावं ठरलं होतं.त्यामुळे उद्धव ठाकरेंना विरोध करणं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या निर्णयाला विरोध करणं असं आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे.

Just a moment...

Leave Comments