By Editor on Monday, 27 February 2023
Category: पुणे शहर

[Saam tv]राज्यातले ED सरकार दडपशाही करुन भिती दाखवते

सुप्रिया सुळेंचा घणाघात

 पुणे :पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक महाविकास आघाडीसह भाजपाकडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. या दोन्ही जागांसाठी आज मतदान होत असताना ही निवडणूक शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून निवडणूक पार पडावी अशी आपेक्षा खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत राज्यातले ED सरकार सातत्याने दडपशाही करुन भिती दाखवत असल्याने सरकारकडून काय अपेक्षा करणार असा चिमटाही यावेळी सुप्रिया सुळेंनी काढला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार सुसंस्कृत व्यक्ती समजत होते. मात्र आता तसं राहिलं नाही, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांनाही टोला लगावला आहे. कसबा निवडणुकीत पैशाचं वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.यावेळी फडणवीसांनी पैसे वाटणं आमची संस्कृती नसल्याचे स्पष्ट केले होते. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना चिमटा काढत म्हटलं की, आजकाल फडणवीस कधी काय बोलतील याचा भरोसाच राहिला नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बारामती लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर येत आहेत. अमित शाहांच्या दौऱ्यावर सुप्रिया सुळेंनी अतिथी देव भवो म्हणत बारामतीत जेवढे लोक येतील त्यांचे आमच्याकडून स्वागतच आहे. बारामती ही पहाण्यासारखीच जागा आहे. त्यामुळे जेवढे जास्त लोक येतील त्यांचे स्वागतच आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

Supriya Sule: राज्यातले ED सरकार दडपशाही करुन भिती दाखवते, सुप्रिया सुळेंचा घणाघात

Leave Comments