By Editor on Saturday, 23 September 2023
Category: पुणे शहर

[tv9marathi]‘या’ खासदारावर हक्कभंगाची कारवाई करा

सुप्रिया सुळे यांची लोकसभा सचिवालयाला नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा सचिवालयाला नोटीस दिली आहे. त्या खासदाराने केलेलं वक्तव्य आक्षेपार्ह आहे. त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. खासदार रमेश बिधुडी यांच्या विरोधातलोकसभा सचिवालयाकडे हक्कभंगाची नोटीस सुप्रिया सुळे यांनी पाठवली आहे. रमेश बिधुडी यांनी केलेलं वक्तव्य हक्कभंगाच्या कारवाईत बसतं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी नोटीसद्वारे मागणी केली आहे. रमेश बिधुडी यांचं वक्तव्य लोकसभेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणारं आहे. नियमानुसार हे वक्तव्य हक्कभंगमध्ये बसतं. त्यामुळे यात हस्तक्षेप करत प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी सभागृहात बोलताना बसपाचे खासदार दानिश अली यांना शिवीगाळ केली. बिधुरी यांच्या वक्तव्याचा विरोधकांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. बिधुरी यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. बसपाचे खासदार दानिश अली यांच्याविरोधात अपशब्द वापरल्यामुळे विरोधक आक्रमक झालेत. त्यांच्यावर हक्कभंग आणावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दानिश अली बसपाचे आहेत. पण या मुद्द्यावर बसपापेक्षा इतर पक्ष जास्त आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. सुप्रिया सुळे यांनी लोकसभा सचिवालयाला नोटीस पाठवली आहे. सुळे यांच्यासह तृणमूलच्या अपूर्वा पोद्दार, डीएमकेच्या खासदार एम. के. कनिमोळी यांनीही हक्कभंगाची नोटीस दिली आहे.

Enter some title here...

Leave Comments