By Editor on Thursday, 04 July 2024
Category: पुणे शहर

[TV9 Marathi]अजित पवार यांच्या 'त्या' व्हिडीओवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी जुमला आहे. आता दोन, तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. परंतु या योजनेचा त्यात काही फायदा होणार नाही. ही योजना चांगली आहे, मात्र त्यात अटी शर्थी टाकल्या आहेत. त्यामुळे खरेच योजना किती महत्वाची आहे, त्याचा अभ्यास सुरू आहे. या योजनेमध्ये भ्रष्टाचार होऊ नये, ही अपेक्षा आहे. या योजनेचे स्वागत केले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

Leave Comments