पुण्यातील सिंहगड रोडवर असणाऱ्या अनेक सोसायटींमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांवर मोठं संकट कोसळलं आहे. अतिवृष्टीमुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेकडो वाहनांचं नुकसान झालं आहे. लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे अनेक महिलांनी हंबरडा फोडला आहे. या परिसरात अद्यापही वीज सुरु झालेली नाही. याशिवाय सोसायट्यांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ भरला आहे. त्या अद्यापही स्वच्छ झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरीक खूप हतबल आहेत. या नागरिकांच्या घरातील सर्व सामानाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील इतर नागरिकांना नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचं आवाहन केलं आहे.