By Editor on Sunday, 22 October 2023
Category: पुणे शहर

[Lokshahi Marathi]मुंबईतील खरा अन् डुप्लिकेट माल महाराष्ट्राच्या लोकांना कळतो, सुळेंचा रोख कुणावर?

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची माफी मागतली पाहिजे. शरद पवार काय मंत्रिमंडळात नव्हते. आज देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर जे सहकारी आहेत हेच लोक आधी सरकारमध्ये होते. गैरसमज पसरवला म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे. मला देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल सहानुभूती आहे की मुख्यमंत्री असणार माणूस हा उपमुख्यमंत्र झाला आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.बाजारात दोन प्रकारचे माल मिळतात एक डुप्लिकेट आणि ओरिजनल.त्यामुळे खरी शिवसेना कोणाची आहे हे लोकांना माहिती आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शिंदेगटाला टोला लगावला आहे.

Leave Comments