By Editor on Sunday, 24 September 2023
Category: पुणे शहर

[thekarbhari]विकास आराखड्याअभावी पालिकेत समाविष्ट केलेल्या गावांच्या विकासकामांत अडथळे

तातडीने विकास आराखडा तयार करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे मागणी

DP of Included Villages | पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा आराखडाच (Included Villages DP) अद्याप तयार झालेला नाही. परिणामी या गावांत विकासकामे करताना नेहमी अडथळे येत आहेत, तरी तातडीने या गावांचा करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि (Chandrakant Patil) पालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांना टॅग करत खा. सुळे यांनी याबाबत X वर Post (Post on X) केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासाबाबत कोणतेही महत्वाचे निर्णय होत नाहीत. यामागे समाविष्ट गावांसाठीचा विकास आराखडा तयार झाला नसल्याचे कारण सांगण्यात येते. याचा मोठा फटका या गावांतील नागरिकांना बसत असून पायाभूत सुविधांच्या पूर्ततेबाबतही अडचणी येत आहेत. ही मोठी काळजीची गोष्ट आहे, असे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असून, प्रशासकीय आणि शासकीय दिरंगाईचा त्रास नागरीकांना सहन करावा लागतो, हे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आणि पुणे महापालिका आयुक्त यांनी तातडीने पुढाकार घेऊन विकास आराखडा तयार करुन तो मंजूर करण्यासंबंधी सकारात्मक विचार करुन कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

DP of Included Villages |विकास आराखड्याअभावी पालिकेत समाविष्ट केलेल्या गावांच्या विकासकामांत अडथळे - TheKarbhari

Leave Comments