अजित पवार यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांच्यासह नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सकाळी पुण्यात प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या दादाची सर्व इच्छा पूर्ण व्हावी हीच माझीही इच्छा आहे. दादांना संघटनेत पदावर संधी द्यायची की नाही हा संघटनात्मक निर्णय आहे. मला मनापासून आनंद हे की दादालाही संघटनेत काम करायची इच्छा आहे. यामुळे कार्यकर्ता केडरमधे उत्साह संचारलाय, दादांना प्रदेशाध्यक्षपद द्यायचं की नाही हा संघटनात्मक पातळीवरचा निर्णय आहे. माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच बहीण म्हणून इच्छा आहे" अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे.