By newseditor on Tuesday, 23 October 2018
Category: पुणे शहर

मी मुख्यमंत्र्यांसारखं खोट बोलतं नाही : सुप्रिया सुळे



योगिराज प्रभुणे, सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

पुणे : सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची फसवणूक फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार या योजनेतून केली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केली.

"जलयुक्त शिवार'च्या कामाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे टोलवत त्या म्हणाल्या, "माननीय मुख्यमंत्री जेव्हा पुण्यात येतील तेव्हा हे त्यांना जरूर विचारा. हा त्यांचा, त्यांच्या सरकारचा "फ्लॅगशिप प्रोग्रॅम' आहे. त्यामुळे त्याचं उत्तर त्यांनीच दिले पाहिजे. कारण, त्यांच्यासारखे नुसते आरोप करण्याची माझी स्टाइल नाही आणि खोटं मी बोलत नाही.''

"जलतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जलयुक्त शिवार हा कार्यक्रमाची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी झाली. पुरेसा अभ्यास न करता घाईघाईने योजना राबविली. हा "पब्लिसिटी स्टंट' असेल. मुख्यमंत्री जाहिरात करण्याच्या मागे जास्त असतात. कार्यक्रमाची अंमलबजावणीतील त्रुटी आणि त्याचा मिळणारा प्रतिसादाचा आढावा घेतला नाही. त्यातच हा प्रकल्पातील तांत्रिक चुका आणि नंतर पैशाचीपण कमतरता झाल्याने सगळा गोंधळ झाला आहे,'' असे त्या म्हणाल्या.

"जलयुक्त शिवारासाठी सरकारने किती कामे केली आणि श्रमदानातून किती कामे उभी राहिली, याचाही हिशेब सरकारने दिला पाहिजे. सरकारने त्यांचा "फ्लॅगशिप प्रोग्रॅम राबविला. त्यासाठी "पब्लिसिटी' केली,'' असे सुळे यांनी सांगताच यावर तुमची भूमिका काय, या प्रश्‍नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, ""मी खोटं बोलत नाही आणि दुसऱ्याच्या कामाचे "क्रेडिट' घेत नाही आणि त्यांच्यासारखे बिनबुडाचे आरोपही करत नाही. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक आता बोलत आहेत. पण, सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची फसवणूक या सरकारने आणखी एका कार्यक्रमातून केली.''

http://www.sarkarnama.in/i-dont-speak-lie-cm-sule-29931