अंजली दमानियांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील गोवंडी येथे बीएमसीने ५०० कोटी रुपये खर्चून बांधलेले शताब्दी रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) तत्त्वावर देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा दमानियांनी केला आहे. हे लोकांच्या पैशातून बांधलेले रुग्णालय राजकारण्यांच्या घशात घालण्याचा मोठा घोटाळा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.