By Editor on Monday, 16 October 2023
Category: पुणे शहर

[ABP MAJHA]बोरवणकरांची पुस्तकातून अजित दादांवर टिका, सुप्रिया ताई म्हणतात...

पुणे- येरवड्यातील पोलिस ठाण्याच्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता, असा गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर लिखित 'मॅडम कमिशनर' या पुस्तकाच्या 'द मिनिस्टर' या प्रकरणामध्ये करण्यात आला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माजी पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जमिनीच्या लिलाव करण्याच्या निर्णया संदर्भात आरोप केले. या संदर्भात बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी अजुनही ते पुस्तक वाचलेलं नाही. मला वाटतं यावर बोरवणकरच यावर स्पष्टीकरण देऊ शकतात, आरोप करणारे लेखक आहेत असं दिसतंय. ते पुस्तकच मी अजुनही वाचलेलं नाही, त्यामुळे मी यावर काहीही बोलू शकत नाही, असंही खासदार सुळे म्हणाल्या.

Leave Comments