By Editor on Tuesday, 26 September 2023
Category: पुणे शहर

[maharashtradesha]भाजपला पत्रकारांना निर्भीडपणे काम करू द्यायचं नाही – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचं एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचं म्हणजे समजलेच असेल तुम्हाला असे सांगत त्यांनी ढाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगर येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला असल्याचं वृत्त लोकमत वृत्तपत्रानं दिलं आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. पत्रकारांना निर्भीडपणे काम करू द्यायचं नाही हे भाजपचे धोरण असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

ट्विट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, "विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही‌. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात.राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे.

ज्याअर्थी चंद्रशेखर बावनकुळेजी कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे.

भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌."

Supriya Sule | भाजपला पत्रकारांना निर्भीडपणे काम करू द्यायचं नाही - सुप्रिया सुळे

Leave Comments