By Editor on Wednesday, 19 April 2023
Category: पुणे शहर

[Lokmat]वेताळ टेकडीवरील एकही झाड न कापता इतर पर्याय शोधावेत- सुप्रिया सुळे

पुणे : ''जनतेचा विरोध होत असेल, तर प्रशासनाने त्याचा विचार करायला हवा. पुण्याचे पर्यावरण वाचविणे आवश्यकच आहे.टेकडीवरील पर्यावरण कमी न करता, एकही झाड न कापता त्या रस्त्यासाठी इतर पर्याय पहायला हवेत,'' असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सध्या वेताळ टेकडीवरील प्रस्तावित बालभारती रस्त्याला प्रचंड विरोध होत आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी सुळे यांनी मंगळवारी वेताळ टेकडीची पाहणी केली. त्या लॉ कॉलेज रोडवरील कांचनगल्लीमध्ये दुपारी १ वाजता आल्या. त्यांनी कृती समितीच्या सदस्यांसमवेत रस्ता कुठून जाणार आहे ? किती आणि कोणती झाडं तोडणार आहेत, त्याविषयी माहिती घेतली. त्यानंतर वन विभागाच्या कार्यालयात बसून कृती समितीने तयार केलेले टेकडीबाबतचे सादरीकरणही जाणून घेतले. या वेळी समितीचे प्रदीप घुमरे, सुमिता काळे, डॉ. सुषमा दाते, पृथ्वीराज, शाल्मली पवार, समीर शिंदी आदी उपस्थित होते. उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहाय्यक उपवनसंरक्षक दीपक पवार हे देखील सादरीकरणावेळी उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या,''विकास करणे आवश्यक असले तरी पर्यावरण संवर्धनही केले पाहिजे. वेताळ टेकडीवरून रस्ता काढायचा असेल तर इतर पर्याय पहावेत. एकही झाड कापू नये. लोकांच्या भावना प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे. आम्ही तज्ज्ञ लोकांशी बोलू. तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून टेकडीवरील झाडे कापली जाणार नाहीत, हे पाहून वाहतुकीला इतर पर्याय शोधावेत.'' 

ही टेकडी नाही तर काय आहे मग ?

​महापालिका आयुक्त विक्रम कुमार यापूर्वी म्हणाले होते की, रस्ता होतोय, ती टेकडीच नाही.'' त्यावर सुळे म्हणाल्या,'' ''काही लोकं म्हणतात, टेकडीवर रस्ता आहे, तर काही लोकं म्हणतात टेकडवर रस्ता नाही. यामध्ये वस्तूस्थिती काय आहे ? ते पाहण्यासाठी मी टेकडी पहायला आले. प्रशासनाला वाटत असेल की, ही टेकडी नाही, तर मी पाहिली ना ही टेकडीच आहे. त्यांना जर वाटत नसेल की ही टेकडी नाही, तर मग टेकडी कशी असते ?'' असा अप्रत्यक्ष सवाल त्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना विचारला.

वेताळ टेकडीवरील एकही झाड न कापता इतर पर्याय शोधावेत- सुप्रिया सुळे - Marathi News | supriya sule said Other options should be explored without cutting a single tree on the vetal hill | Latest pune News at Lokmat.com

Leave Comments