By Editor on Sunday, 26 November 2023
Category: पुणे शहर

[loksatta]पुण्यातील आजीबाईंनी सुप्रिया सुळेंना विचारलं

"सध्याचं राजकारण कसं वाटतं"

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधत असताना अचानक सुमन कचरे या आजी आल्या आणि सध्याच्या राजकारणाबद्दल काय सांगाल, असा थेट प्रश्नच विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे दुर्दैव असून महाराष्ट्रच राजकारण गलिच्छ झालं आहे.

हे राजकारण जनतेने गलिच्छ केले का? भ्रष्टाचार कोण करतंय या सर्वांना फुस कोण लावत आहे. असे एकामागून एक प्रश्न विचारत सुप्रिया सुळे यांना आजींनी जाब विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भ्रष्टाचार कोण करीत आहे. हे तुम्हाला आणि मला देखील माहिती आहे. माझ्यावर एक तरी भराष्टाचाराचा आरोप १५ वर्षात लागला का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी आजींना विचारला. त्यावर आजीबाईंनी सुद्धा दुजोरा देत सुप्रिया सुळे यांना आशीर्वाद दिला. "तुमची मोठी एक ताकद असून जे फोडाफोडीचं राजकारण करीत नसतील आणि भ्रष्टाचारी नाही. अशा व्यक्तीना मतदान करा" असे आवाहन देखील सुप्रिया सुळे यांनी आजींना केले. तर सुमन कचरे या आजींनी सुप्रिया सुळे यांच्या कामाचं कौतुक देखील केलं.

पुण्यातील आजीबाईंनी सुप्रिया सुळेंना विचारलं, "सध्याचं राजकारण कसं वाटतं" | old women from Pune asked Supriya Sule How do you feel about current politics | Loksatta

Leave Comments