By Editor on Saturday, 11 November 2023
Category: पुणे शहर

[sarkarnama]राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबीय प्रथमच जमलं एकत्र

जाणून घ्या, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

Pune Political News : आज संपूर्ण पवार कुटुंबीय दिवाळीच्या निमित्त एकत्र जमलं होतं . ज्येष्ठ उद्योजक आणि सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंसह अन्य पवार कुटुंबीय जमलेले होते. या सगळ्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''दरवर्षी बारामतीला पूर्ण कुटुंब जमा होतं. परंतु यंदा प्रतापराव पवार यांच्या पत्नींची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे ते कुटुंब यंदा बारामतीला येणार नाही. त्यामुळे दिवाळीची सुरुवात आज प्रतापराव पवारांच्या घरून झाली. आता दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्वजण संपूर्ण दिवाळीत बारामतीमध्ये असणार आहोत.'' याचबरोबर ''अजितदादांची तब्येत अजून पूर्णपणे बरी झालेली नाही. डेंग्यू झाल्यावर पोस्ट डेंग्यू म्हणजेच जरी रिपोर्ट नॉर्मल आलेले असतील, तरी प्लेटलेट्सचं बरेच दिवस बघावं लागतं. कारण, अनेकदा डेंग्यूच्या प्रकरणात आपण बघितलेलं आहे की लोकांना पुढे जास्त त्रास होतो .'' असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

याशिवाय ''काही वर्षांपूर्वी मला स्वत:ला डेंग्यू झालेला आहे. त्यामुळे डेंग्यूनंतरची काळजीही महत्त्वाची असते. अशक्तपणाही खूप जाणवतो. त्यामुळे काही दिवस अजितदादांना काळजी घ्यावी लागेल. सध्या प्रदूषण प्रचंड वाढले आहे. पुणे, मुंबई, दिल्लीत अतिशय वाईट हवा राहत आहे. त्यामुळे या सगळ्या काळात डेंग्यूनंतरची काळजी घेणं गरजेचं आहे.'' असंही या वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule news : अजित पवारांच्या आजारपणाबाबतही दिली आहे प्रतिक्रिया

Leave Comments