पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे. या मृत्यूप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, तसेच या मृत्यूमध्ये ज्या डॉक्टरांचा तसेच अन्य लोकांचा समावेश आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. त्यानंतर या रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. असे असताना राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीदेखील ईश्वरी भिसे या महिलेचा मृत्यू झालेला नसून तिची हत्या झाली आहे, असे म्हणत या प्रकरणातील डॉक्टरांवर लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणावर बोलताना राज्य सरकारवरही टीका केली आहे.