खा. सुळेंनी थेट गडकरींकडे केली तक्रार
पुणे- पुण्यातील रस्त्याच्या खड्ड्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला जाब विचारला आहे. त्यांनी या संदर्भात एक पोस्ट केली असून त्यांनी रस्त्याची बिकट अवस्था निदर्शनास आणून दिली आहे. त्यांनी एक फोटो शेअर केलाय. चांदनी चौकातून एनडीए पासून मुळशीकडे जाणारा रस्त्यावरील खड्डा त्यांनी या फोटोतून दाखवला आहे.
सुप्रिया सुळे यांनी 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, चांदनी चौकातून एनडीए पासून मुळशीकडे जाणाऱ्या नव्या रस्त्यावर हा असा खड्डा पडला आहे. 'एनएचएआय'ने हे काम तपासून पाहण्याची गरज आहे. या रस्त्याचे उद्घाटन होऊन अद्याप वर्ष देखील उलटले नाही तोवर ही स्थिती झाली. रस्त्याच्या या अशा कामामुळे प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. ही अतिशय गंभीर व खेदजनक बाब आहे.
विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी सांगितलेल्या रस्ता तयार होऊन अद्याप वर्ष देखील झालेला नाही. त्याआधीच या रस्त्यावर खड्डा पडला आहे. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे उद्धाटन झाले होते. पण, लगेच त्यावर खड्डा पडल्याने रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग केले आहे. सरकार संबंधीत कंत्राटदारावर कारवाई करते का हे पाहावं लागणार आहे.
दरम्यान, राज्यभरातील खड्ड्यांच्या स्थितीवर राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाल आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या स्थितीवरुन राज्यात वारावरण तापलं होतं. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी या मुद्द्यावरुन सरकारला चांगलंच धारेवर धरलं. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडले आहे. मुंबई-गोवा महामार्गाची स्थिती अत्यंत बिकट असून प्रवाशांचे हाल सुरु आहेत.