By Editor on Saturday, 23 September 2023
Category: पुणे शहर

[maharashtratimes]खरंच अजितदादा आपलं कल्याण बघत नाहीत?

त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण....

पुणे : अजित पवार हे माझे मोठे बंधू आहेत. अर्थातच माझ्यावर जे संस्कार झाले आहेत त्यानुसार मोठ्या भावाचा मान सन्मान केलाच पाहिजे. मी या संस्कृतीत वाढलेली आहे. मी कुठलीही भूमिका अजित पवारांबद्दल मांडली नाही आणि कधी मांडणारही नाही. त्यांच्या विरोधात भूमिका न घेणे याबद्दल माझे प्रांजळ प्रयत्न आहेत, असं स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यातल्या गणपती मंडळाच्या दर्शनाला आल्या होत्या. पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण देण्याबाबत सुप्रिया सुळे यांनी नवीन संसद भवनात आक्रमक भाषण केलं होतं. या भाषणात सगळे भाऊ आपल्या बहिणीची काळजी घेतातच असं नाही, असं व्यक्तव्य करताना सुप्रियाताईंचा रोख अजितदादांकडे होता का? असा सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला होता. हाच प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला.

दादांबद्दल विरोधात भूमिका घेणार नाही!

​सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार माझे मोठे बंधू आहेत. माझ्यावर जे संस्कार झाले आहेत त्यानुसार मोठा भाऊ म्हणून त्यांचा मान सन्मान झालाच पाहिजे किंबहुना केलाच पाहिजे. मी या संस्कृतीत वाढलेली आहे. मी कुठलीही भूमिका ही अजितदादांबद्दल मांडली नाही आणि कधी मांडणारही नाही. विरोधात भूमिका न घेणे याबद्दल माझे प्रांजळ प्रयत्न आहेत.

आरोप खोटे असतील तर माफी मागणार काय? सुप्रिया सुळे यांचा मोदींना सवाल

​पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित यांनी दोन स्टेटमेंट केली होती. त्याबद्दल मी माझं मत व्यक्त केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने गेले दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला भ्रष्टाचारी म्हटले आहे. म्हणून मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारायचं आहे की, तुम्ही केलेले आरोप हे खोटे होते की खरे होते की राजकीय होते? कारण राष्ट्रवादी सोबत असलेलेला एक गट तुमचा सोबत सत्तेत सामील झाल्यानंतर तुम्ही आरोप करणं बंद केले आहेत. म्हणून याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट करावं की आरोप खरे असतील तर त्यांच्यावर कारवाई करणार आहात का अन्यथा आरोप खोटे असतील तर भारतीय जनता पार्टीने त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केले पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बहिणीचं कल्याण बघणारा भाऊ प्रत्येक घरात असतोच असं नाही...

लोकसभेत महिला आरक्षणासंबंधी विधेयकावर चर्चा सुरु होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी बहिणीचं कल्याण बघेल, असा भाऊ प्रत्येक घरात नसतो, असं वक्तव्य केलं. त्यांचं वक्तव्याचा रोख अजितदादांकडे होता, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. महिलांबाबत महिलांनीच बोलावं असं नसतं... भावांना देखील बहिणीची काळजी असते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावल्याची चर्चा होती.

Supriya Sule Clarification On Parliament Speech Critisicm Ajit Pawar; प्रत्येक घरात बहिणीचं कल्याण बघणारा भाऊ नसतो, त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण | Maharashtra Times

Leave Comments