By Editor on Monday, 24 April 2023
Category: पुणे शहर

[TV9 Marathi]पुणे-बंगळुरु महामार्गावर अपघात

नितिन गडकरींशी चर्चा करणार-खासदार सुप्रिया सुळे

 पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलापासून जवळच स्वामी नारायण मंदिरा समोरील पुलाखाली आज मध्यरात्री पुन्हा मोठा अपघात झाला. त्यात चारजणांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेत मरण पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारने तातडीने मदत जाहिर करण्याची आवश्यकता आहे. याखेरीज या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींवरील उपचारांचा खर्च राज्य सरकारने उचलावा ही आमची मागणी आहे. शासनाने संवेदनशीलता दाखवून याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.या भागातील अपघातांची मालिका थांबावी यासाठी उपायोजना करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपण लवकरच चर्चा करुन आणखी सुधारणा कशा करता येतील यावर भर देण्याचा प्रयत्न असणार आहोत. संसदेत देखील हा मुद्दा आपण मांडला असून सर्व विभागाशी समन्वय साधून हा रस्ता अपघातमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Leave Comments