खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १२) दौंड शहरात टंचाई आढावा बैठक आयोजित केली होती. शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात सकाळी दहा वाजता बैठकीस सुरवात होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी दिली होती. सुळे यांनीही याबाबत पोस्ट करताना म्हणाल्या कि आज दौंड येथिल तहसील कार्यालयात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय संसद महारत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली दौंड तालुक्यातील टंचाई आढावा बैठक घेण्यात आली.जनतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला साहेब,तहसिलदार अरुण शेलार साहेब,गटविकास अधिकारी अजिंक्य येळे,तालुका कृषी अधिकारी राहुल पाटिल,महावितरणचे चव्हाण साहेब,पाठबंधारे विभागाचे बनकर व साळुंखे साहेब,सार्वजनिक बांधकाम विभागाचे माळशिखरे साहेब या सर्व अधिकारी यांच्या समवेत प्रत्येक विभागातील उद्भवणारे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले त्यावर अधिकाऱ्यांनी देखिल सकारात्मक प्रतिसाद दिला,काही प्रश्न त्याच ठिकाणी मार्गी लागले.दौंड शहर आणि तालुक्यात भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,शेतीच्या पाण्याचा प्रश्न,जनावरांच्यासाठी चारा छावण्या,टंचाई ग्रस्त भागात सुरू करावे लागणारे पाणी टँकर,महावितरणचे प्रश्न अशा प्रकारच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. अशी माहिती सुळे यांनी दिली आहे.