राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर आज पवार काका पुतण्या दुसऱ्यांदा एकाच व्यासपीठावर आल्याचं बघायला मिळालं. पण यावेळीचा सर्वात मोठा फरक म्हणजे आज दोघांनीही आवर्जून एकमेकांची नावं भाषणात घेतली. कारण निमित्तच कौटुंबिक सोहळ्याचं होतं. मात्र, यानंतर पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, की वैचारिक प्रगल्भता वयाप्रमाणे येत असते, उगाच पांढरे केस नाही झाले? शेवटी कुटुंब आहे, अशा वेळी आम्ही एकत्र येत असतो.