लोकसभेतील नवनियुक्त खासदारांना मंगळवारी ही शपथ दिली गेली. सकाळचे सत्र महाराष्ट्रातील खासदारांनी गाजवले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नियमाला धरून मराठीमध्ये शपथ घेतली. ५ मराठी मंत्र्यांनी सोमवारी शपथ घेतली होती. मंगळवारी ४३ खासदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.