मिलिंद संगई : 09.37 AM
सुप्रियाताई ठरल्या देवदूत
बारामती शहर - नशीबाची दोरी बळकट असेल तर अनेकदा काही व्यक्ती देवदूतासारख्या धावून येत जीवदान देतात. असाच काहीसा प्रत्यय इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील पाटील कुटुंबियांना आला. खासदार सुप्रिया सुळे या वेळेस एखाद्या देवदूताप्रमाणे मदतीला धावून आल्या आणि पाटील कुटुंबियातील अवघ्या दोन महिन्यांचा अथर्व अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आला.
अथर्वचा जन्म झाल्यानंतर त्याच्या शरीरात अशुध्द रक्ताचा पुरवठा होत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. हृदयात गुंतागुंत निर्माण झाल्याने त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रीया करणे गरजेचे होते. इतक्या छोट्या बाळावर शस्त्रक्रीया करणे जोखमीचे काम असल्याने त्याला दहा लाखांवर खर्च येणार असे पाटील कुटुंबियांना सांगितले गेले.
इतका मोठा खर्च करणे पाटील कुटुंबियांना अवघड होते, त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची त्यांचे स्वीय सहायक नितिन सातव यांच्या मदतीने भेट घेतली. सुप्रिया ताईंनी क्षणाचाही विलंब न लावता मुंबईच्या एस.एल. रहेजा असोसिएटच्या रुग्णालयास फोन लावला. ताईंचे समन्वयक डॉ. संतोष भोसले यांनी या बाबत त्वरेने पुढील कार्यवाही केली. ताईंचा फोन गेल्यानंतर रुग्णालयाची सूत्रे भराभर हलली व अथर्व याच्यावर ही अवघड शस्त्रक्रीया विनामूल्य तर झालीच पण नंतरची देखभाल व औषधेही निशुल्क मिळाली. दहा दिवसानंतर अथर्व याला बारामतीत आणले गेले आहे. सध्या अथर्व याची तब्येत उत्तम असून बारामतीचे डॉ. राजेंद्र मुथा यांच्या निरिक्षणाखाली तो आहे.
ताई याच अथर्वसाठी देवदूतअथर्वचे प्राण वाचविण्यासाठी सुप्रियाताई अक्षरशः एखाद्या देवदूताप्रमाणे धावून आल्या, त्यांनी पाठपुरावा केला नसता तर अथर्वचे काय झाले असते माहिती नाही, अशी भावनिक प्रतिक्रीया पाटील कुटुंबियांनी व्यक्त केली.
http://www.esakal.com/pune/two-months-atherva-survived-137874