By newseditor on Friday, 25 May 2018
Category: बारामती विधानसभा

दोन्ही काॅग्रेसची आघाडी लवकर व्हावी होण्यासाठी प्रयत्नशील : सुळे








मिलिंद संगई : शुक्रवार, 25 मे 2018

दोन्ही काॅग्रेसची आघाडी लवकर व्हावी होण्यासाठी प्रयत्नशील


बारामती शहर :  राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी लवकरात लवकर व्हावी असा माझा स्वताःचा वैयक्तिक प्रयत्न असल्याची स्पष्ट भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बोलून दाखविली. बारामतीतील पोस्ट कार्यालयातील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या.

ही आघाडी जितकी लवकर होईल तितके मतभेद संपविण्यासह एखादे पाऊल पुढे मागे करायलाही वेळ मिळू शकतो, त्यामुळे ही आघाडी व कार्यकर्त्यांचे मनोमीलन यासाठी वेळ जाऊ नये. दोन्ही पक्षांना थोडे कमी जास्त करावे लागेल पण आघाडी व्हावी असे आपल्याला मनापासून वाटते. चांगली राजकीय आघाडी झाली आणि मतांचे विभाजन झाले नाही तर खूप चांगला बदल राज्यात बघायला मिळेल,`` असा विश्वासही सुळे यांनी बोलून दाखविला.

गामी निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकीय चित्र शंभर टक्के बदलेल, राज्यात मुख्यमंत्री जरी निवडणुका जिंकत असले तरी केवळ निवडणपका जिंकणे म्हणजे सर्व काही नसते, या राज्यातील जनता दुःखी असून काय उपयोग? शेतक-यांना हमी भाव नाही, अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला, सरकार कसला विचारच करायला तयार नाही, यांच्या मनात नेमक चाललय तरी काय हेच समजेनासे झाले आहे, असे सुळे यांनी सांगितले.

आकडोंसे पेट नही भरता

आमचे सरकार होते तेव्हा सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या आकडोंसे पेट नही भरता है, भूक लगती है तब धान लगता है !.आज मलाच तो प्रश्न भाजपला विचारायचा आहे, मी संसदेत भाजपला हाच प्रश्न विचारणार आहे, असे त्यांनी सांगितले.

http://www.sarkarnama.in/trying-alliance-between-both-congress-sule-24178

Leave Comments