By newseditor on Tuesday, 10 April 2018
Category: बारामती विधानसभा

डिजिटल इंडियाने पोट भर नाही - सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

शिरूर येथील हल्लाबोल आंदोलनात बोलताना सुप्रिया सुळे

पुणे, दि. २० (प्रतिनिधी) – केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देशभरात जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न उभे राहतात, तेव्हा पवार साहेबच धावून येतात. डिजिटल इंडियाची गरज आहेच; पण केवळ त्याने पोट भरत नाही ते काम फक्त शेतकरीच करू शकतो, असा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. शिरूर येथे झालेल्या हल्लाबोल सभेत त्या बोलत होत्या. पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि अन्य नेते तसेच शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते याप्रसंगी उपस्थित होते. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळायला हवी, अशी मागणी करून सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या ज्या वेळी या राज्यातला किंबहुना देशातलाही शेतकरी अडचणीत आला आहे, त्या त्या वेळी शरद पवार साहेब त्याच्या मदतीला धावून गेले आहेत. हा गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे. शेतकऱ्यांना मदत ककरताना त्यांनी कधी सरकार मध्ये आहोत, की विरोधी पक्षात आहोत याचाही कधी विचार केला नाही. आगामी काळात शेतकर्यांसाठी आणि पर्यायाने राज्यासाठी अनेक योजना आमच्याकडे तयार आहेत. त्यांतील अनेक योजना, अपक्रम आम्ही बारामतीत राबविले आहेत. त्यातून विकास साधत बारामती शहराला एक आदर्श नगरपालिका बनवली आहे. येत्या निवडणुकीत शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार निवडून आल्यास आम्ही येथे बारामतीपेक्षा जास्त कामे येथे करू, असे आश्वासन सुळे यांनी यावेळी शिरुरकरांना दिले.

पुरोगामी माहाराष्ट्राला हे शोभणारे नाहीनिती आयोगाचा अहवाल नुकताच पसिद्ध झाला असून त्यात राज्यात स्त्रीभ्रूणहत्या वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. याहून खेदाची बाब अशी की, गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात जास्त स्त्रीभ्रूणहत्या झाल्या आहेत. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.

Leave Comments