By Editor on Thursday, 02 February 2023
Category: बारामती विधानसभा

[Sakal]नीरा-बारामती मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करा-सुप्रिया सुळे

 बारामती - बारामती लोकसभा मतदारसंघातील पालखी मार्ग आणि लोणंद (सातारा) या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा नीरा-बारामती हा रस्ता राष्ट्रीय रस्ते महामंडळाकडे वर्ग करून तो राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

केंद्रीय केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार सुळे यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे. माजी सनदी अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजीराव झेंडे यांनी सुळे यांच्या वतीने गडकरी यांना हे पत्र दिले. सध्या हा रस्ता राज्य मार्ग आहे.

​राष्ट्रीय महामार्ग 965 संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग (नीरा जंक्शन येथे) आणि राष्ट्रीय महामार्ग 965 डी लोणंद सातारा रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग 160 यांना जोडणारा नीरा बारामती मार्ग (41 कि.मी.) हा रस्ता वर्दळीचा असून तो राष्ट्रीय महामार्ग करावा, अशी स्थानिक नागरिकांचीही मागणी आहे.

Supriya Sule : नीरा-बारामती मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करा; सुप्रिया सुळे | Sakal

Leave Comments